Home    मंडळाचा पर्यावरणपूरक गरुडराज देखावा, भाविकांचे लक्ष वेधले - EDUCATION STUDY CLUB

मंडळाचा पर्यावरणपूरक गरुडराज देखावा, भाविकांचे लक्ष वेधले

25
0
Share:

Breaking News | Akole: पंधरा वर्षे पूर्ण : टाकाऊ वस्तूपासून तयार केले जातात देखावे.

eco-friendly Garudaraj appearance of the mandal, attracted the attention of the devotees

राजूर : येथील शिवदत्त हिंदराज मित्र मंडळाने साकारलेला पर्यावरणपूरक गरुडराज देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे टाकाऊ वस्तूपासून तयार केले जातात. हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यावर्षीही मंडळाचे गरुडराज हा भव्य असा देखावा साकारलेला आहे. देखावा बघण्यासाठी राजूर व परिसरातील भाविक गर्दी करीत आहेत.

मंडळाला यावर्षी पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. या अगोदरही मंडळाने भंडारदरा, केदारनाथ, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, काश्मीर, शेषनाग, इंद्र दरबार, प्रति जेजुरी, सीतागुफा असे अनेक प्रकारचे देखावे साकारले असल्याचे अध्यक्ष आशिष हंगेकर यांनी सांगितले. मंडळातील तरुण सदस्य हे एक महिना अगोदर तयारीला लागतात. दिवसभराची कामे आटोपून रात्री सर्व येऊन दिलेल्या नियोजनानुसार टाकाऊ वस्तूपासून त्यात एक सौंदर्य निर्माण करण्याचे काम करतात. आपल्या हाताने हे बनवितात. समतोल विविध पर्यावरणाचा निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून कमी खर्चात एकत्र देखावे राखत देखावा तयार केला जातो. सामाजिक संदेश किंवा एखादी कलाकृती, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मिळणारा आनंद काही वेगळाच व भव्य दिव्य असतो. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आशिष हंगेकर, उपाध्यक्ष पार्श्व मेहता, कार्याध्यक्ष संतोष जगदाळे, सचिव हिरेण रुपडा, खजिनदार मनोज हंगेकर, व्यवस्थापक धवल मेहता व ऋषिकेश हंगेकर, सर्वेश जगदाळे, क्रिश मेहता, सम्यक मेहता, हर्षित मेहता, आदित्य जगदाळे, अवधूत चव्हाण, अक्षय पंडित, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: eco-friendly Garudaraj appearance of the mandal, attracted the attention of the devotees

Share:

Leave a reply

error: Content is protected !!
Home