मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे छोट्यांचे गणेश मंडळ
Ahmednagar: शेवगाव शहरातील बाल गणेश मंडळाने ढोल-ताशाच्या गजरात काढलेली गणेश विसर्जन मिरवणूक.
शेवगाव: गणेश उत्सवातील ध्वनिप्रदूषण हा शेवगावकरांच्या चिंतेचा विषय झाला आहे. रविवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा कर्णकटू आवाज प्रदूषणाच्या सर्व पातळ्या ओलांडून जाणारा ठरला. पोलिस यंत्रणाही त्यांच्या पुढे हतबल झालेली दिसून आली. मोठ्यांची गणेश मंडळे में विधायकतेकडून उन्मादाकडे वाटचाल करत असताना शेवगावातील मारवाड गल्लीतील बाल गणेश मंडळाने मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
५ ते १५ वयोगटातील २५ बालकांनी स्थापन केलेल्या या मंडळाने ढोल-ताशा यांच्या गजरात काढलेली शिस्तबद्ध मिरवणूक शहरात कौतुकाचा विषय ठरली. या बाल चमूने ढोल-ताशा वादन स्वतः शिकून घेत ध्वनी प्रदूषणाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली. शिवाय संपूर्ण उत्सवात शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या विविध खेळांची प्रात्यक्षिके आयोजित करत मोबाइलपासून सभासदांना दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Web Title: Ganesha Mandal of the little ones putting anjaan in the eyes of the elders